स्टिव्ह जॉन्सनला विजेतेपद

मंगळवार, 18 एप्रिल 2017

लॉस एंजलिस - अमेरिकेच्या चौथ्या मानांकित स्टिव्ह जॉन्सन याने ह्युस्टन एटीपी टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने ब्राझीलच्या थॉमस बेलुसी याचा ६-४, ४-६, ७-६(७-५) असा पराभव केला. कारकिर्दीमधील दुसरे एटीपी विजेतेपद मिळविणाऱ्या जॉन्सनचे घरच्या कोर्टवरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.

डेव्हिस करंडकाची लढत ऑस्ट्रेलियात खेळून येथे दाखल झालेल्या जॉन्सनची अंतिम लढतीत धडाक्‍यात सुरवात होती. मात्र, अखेरच्या सेटमध्ये ४-२ असे पिछाडीवर असताना त्याच्या पायात क्रॅम्प आला. पण, जिद्दीने खेळ करत त्याने ४-४ अशी बरोबरी साधली आणि नंतर टायब्रेकरमध्ये बाजी मारली. बेलुसीने दोन मॅच पॉइंट वाचवले. पण, तो पराभव वाचवू शकला नाही.