मालेगावची लेक मंजुषाची गगन भरारी!

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मंजुषा ही विराणे (ता.मालेगाव) येथील सर्वसामान्य  शेतकरी अशोक व अनिता पगार यांची कन्या आहे. मंजूषा ही ग्रामीण भागातील जिद्दी खेळाडू म्हणून परिचित आहे. तिच्या खेळासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनसह अनेक सेवाभावी संस्था यांनी सदैव मदत केली आहे. मंजुषा ही गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक डॉ.सुरेखा दप्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून मागील चार वर्षांपासून ती महाराष्ट्र बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहे. तिच्या या चांगल्या कामगिरीची भारतीय बेसबॉल संघटनेने दखल घेऊन तिची भारतीय संघात निवड केली.

मालेगाव : मंजुषा पगार हीची भारतीय बेसबॉल संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड होणारी मंजुषा पगार ही मालेगावची पहिली खेळाडू ठरली आहे. (ता.९ ते १५) नोव्हेंबर दरम्यान चीम देशातील झोनगशन येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मंजुषाची निवड झाली. 

सर्वसामान्य शेतक-याच्या मुलीचे यश ; सर्वस्तरातून कौतुक
मंजुषा ही विराणे (ता.मालेगाव) येथील सर्वसामान्य  शेतकरी अशोक व अनिता पगार यांची कन्या आहे. मंजूषा ही ग्रामीण भागातील जिद्दी खेळाडू म्हणून परिचित आहे. तिच्या खेळासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनसह अनेक सेवाभावी संस्था यांनी सदैव मदत केली आहे. मंजुषा ही गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक डॉ.सुरेखा दप्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून मागील चार वर्षांपासून ती महाराष्ट्र बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहे. तिच्या या चांगल्या कामगिरीची भारतीय बेसबॉल संघटनेने दखल घेऊन तिची भारतीय संघात निवड केली. मंजुषा ही सध्या मसगा महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या या निवडीबद्दल मालेगाव तालुक्याच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या निवडीबद्दल संस्थेतर्फे डॉ. प्रशांतदादा हिरे, प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे व शिक्षक यांनी कौतुक केले आहे.

मंजूषा भारतीय बेसबॉल संघाचे नेतृत्व करणार 
ता.२७ ते २९ ऑगस्ट दरम्यान पहिले सराव शिबीर नाकोडा, हरियाणा येथे संपन्न झाले. त्या शिबिरात ५० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून ३० खेळाडूंची दुसऱ्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. ते सराव शिबीर ता.२६ सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान लव्हली विद्यापीठ चंदीगढ येथे संपन्न झाले. या सराव शिबारातून अंतिम १८ खेळाडूंची निवड करण्यात आली. मंजूषा आता भारतीय बेसबॉल संघाचे नेतृत्व करणार असून या खेळाडूंचे सराव शिबीर २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान चंदिगढ येथे होणार आहे. हा संघ ७ नोव्हेंबरला चीनला रवाना होणार आहे. 

प्रतिक्रिया

माझ्या या खेळाच्या वाटचालीत शहरातील मदत करणा-या संस्थांचे धन्यवाद.मालेगावचे नाव साता समुद्रापार नेत देशाचा झेंडा फडकवेल.
- मंजूषा पगार, राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू

ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहचली. मंजुषाच्या निवडीचा सार्थ अभिमान वाटतो.
- अशोक पगार, 
मंजूषाचे वडील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjusha pagar selected to the Indian Baseball team