विवाह कबूल....!  रोईंगपटू दत्तू भोकनळला जामीन मंजूर 

residentional photo
residentional photo

नाशिक: आंतराराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या कथित पत्नी समवेत लग्न झाल्याचे मान्य केले. त्यानंतर न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांच्या न्यायालयात आज दत्तूच्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यास अटी व शर्तीसअधिन राहून 15 हजारांच्या जात मुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. 
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकविजेता रोईंगपटू असलेला दत्तू गेल्या दहाबारा दिवसात कथित पत्नीने केलेला लग्नाचा दावा आणि शारीरीक-मानसिक छळ,फसवणूकीच्या आरोपांमुळे चांगलाच चर्चेत आला. त्यांच्या विरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात कथित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याने पोलिस व क्रीडा क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. पिडित महिला ही नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून दत्तू व तिच्यात 2017 मध्ये वैदिकपद्धतीने लग्न केल्याचे सांगितले होते. यानंतर याबाबत सर्व नातेवाईकांसमक्ष दत्तूने कथित पत्नीस लग्न करण्याचे आश्‍वासनही दिले. मात्र दोन वेळा हे लग्न आजारपण आणि इतर कारणे देत पुढे ढकलण्यात आले होते. 


कबूल.... कबूल.... कबूल! 
दत्तूच्या वकीलांकडून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. 25 मेस दत्तू यास न्यायालयाने पाच दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आज जामीन अर्जावर सुनावणी झाली. यात दत्तू भोकनळ आणि पिडित महिला यांच्या वकीलांमध्ये जामीनांवरून युक्तीवार झाला असता न्यायालयाने दोघांनाही याप्रकरणात तडजोड करण्यासाठी काही तासांचा अवधी दिला. अखेर सायंकाळी सहाला विवाह मान्य असल्याचे कबूल केल्याने न्यायालयाने दत्तू भोकनळला 15 हजार रूपयांच्या जातमुचक्‍यावर, फिर्यादीवर दबाव न टाकणे, आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे या अटी व शर्तींच्या पालन करण्याच्या हमीवर जामीन मंजूर केला. 

न्यायालयाने दत्तू भोकनळ यास अटी व शर्तीच्याअधिन राहून जामीन मंजूर केला आहे. पिडितेसह लग्न झाल्याने आम्ही न्यायालयात मान्यही केले आहे. संपूर्ण खरी परिस्थिती न्यायालयापुढे सांगण्यात आलेली आहे. यापुढे आता कायदेशीर टीमच्या मार्गदर्शनखाली पुढे काय करायचे आहे ते ठरविले जाईल. 
चार्वाक कांबळे (दत्तू भोकनळ यांचे वकील) 

दत्तू भोकनळ ह्याने न्यायालयात फिर्यादी महिलेसमवेत लग्न झाल्याने मान्य केल्याने त्यास जामीन मंजूर झाला आहे. लग्न मान्य ही आमच्यासाठी खास बाब आहे. दोषारोषपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाची नियमित कारवाई होईल. भविष्याचा विचार करता चांगला निर्णय होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
अर्चना शर्मा (फिर्यादीचे वकील) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com