राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये  नाशिकला 2 रौप्य अन्‌ 3 कांस्यपदके 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नाशिक ः नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकाला गवसणी घातली. सब ज्युनिअर मुलींच्या अंतीम फेरीत नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि मुलांच्या अंतीम फेरीत कुशल चोपडाला रौप्यपदक मिळाले. 
तनिषाचा पुण्याच्या प्रीता व्हर्टिकरने 11-13, 11-8, 11-5, 11-6, 11-6 असा 4-1 गुणांनी पराभव केला. तसेच कुशलला मुंबईच्या प्रथम मानांकित आदिल अनंतकडून 11-5, 11-8, 11-9, 11-7 असा 4-0 गुणांनी पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत पुनित देसाई व तरुणांमध्ये सौमीत देशपांडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले.

तनिषाने कांस्यपदकही मिळविले. या स्पर्धेत नाशिकच्या सायली वाणी, अनन्या फडके व पियुष जाधव यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. हे सर्व खेळाडू जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित नाशिक जिमखानामध्ये सराव करतात. टेबल टेनिस जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, नाशिक जिमखान्याचे सचिव राधेश्‍याम मुंदडा, नितीन चौधरी, संघटनेचे सचिव शेखर भंडारी , राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अभिषेक छाजेड, अजिंक्‍य शिंत्रे, हर्षल पवार व आदींनी पदक विजते खेळाडूंचे कौतुक केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Sport