संजीवनी जाधवला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नागपूर ः आपल्या खात्यावर आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक जमा करताना नाशिकच्या संजीवनी जाधवने मंगळवारी भुतानची राजधानी थिम्पू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत भारताचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

नागपूर ः आपल्या खात्यावर आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक जमा करताना नाशिकच्या संजीवनी जाधवने मंगळवारी भुतानची राजधानी थिम्पू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत भारताचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. वैयक्तिक सुवर्णपदके जिंकले असले तरी सांघिक गटात भारताला निर्वीवाद वर्चस्व मिळविता आले नाही. प्रदीप चौधरी, शंकर थापा, अर्जून कुमार आणि रतीराम सैनीचा समावेश असलेल्या पुरुष संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले. मात्र, संजीवनी, पुण्याची स्वाती गाढवे आणि जौमा खातुनच्या भारतीय महिला संघाला श्रीलंकेपाठोपाठ रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नेपाळने ब्रॉंझपदक जिंकले. पुरुषांत शंकर मानने वैयक्तिक रौप्यपदक जिंकले. महिलांत स्वाती गाढवेला पाचवा क्रमांक मिळाला. यात नेपाळच्या धावपटूने रौप्य तर श्रीलंकेच्या धावपटूने ब्रॉंझपदक जिंकले. ही स्पर्धा फक्त पुरुष व महिलांसाठी होती. त्यात दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांगलादेश आणि मालदीवचे संघ सहभागी झाले होते. त्यातही भारताला निर्वीवाद वर्चस्व गाजविता आले नाही. विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने पंधरा दिवसापूर्वी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते. विजेंदरसिंग हे भुतानच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

 

 

Web Title: Nagpur News : Sanjeevani won Asian cross country