T20 : नागपुरात क्रिकेट फिव्हर... (फोटो) 

नरेश शेळके/संदीप सोनी
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये पदार्पण केल्यापासून विराट नेहमीच नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र या मालिकेतून "ब्रेक' घेत विराट सध्या पत्नीसोबत भुतानमध्ये पर्यटन करीत आहे. क्रिकेटप्रेमींना त्याची अनुपस्थिती चांगलीच जाणवली. विराटच्या चाहत्यांनी "विराट, वुई मिस यू' अशा आशयाचे पोस्टर्स मैदानात झळकावून त्याच्याप्रती आदर व प्रेम व्यक्‍त केले. 

नागपूर : भारत-बांगलादेश टी20-सामना सध्या नागपुरात सुरू आहे. हा सामना अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली आहे. 

Image may contain: 4 people, people smiling, people sitting, beard and outdoor

सुधीरकुमार आकर्षण केंद्र 
सचिन तेंडुलकरचा फॅन असलेला सुधीरकुमार मैदानावर प्रेक्षकांचे आकर्षण केंद्र ठरला. जिथे जिथे भारताचा सामना असतो, तिथे तिथे शरीरावर तिरंगा व सचिनच्या टी-शर्ट नंबर घालून सुधीरकुमार हजर असतो. भारतीयांच्या प्रत्येक फटक्‍यावर तसेच विकेटवर हातातील तिरंगा झळकावून तो भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत होता. सामना पाहण्यासाठी आलेला प्रत्येक क्रिकेटप्रेमी त्याच्यासोबत "सेल्फी' घेताना दिसले. 

Image may contain: 2 people, beard and outdoor

दुकानदारांची चांदी 
सामन्याच्या निमित्ताने स्थानिक दुकानदारांची चांगलीच चांदी झाली. पोलिसांनी प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत हेल्मेट, पर्स, बॅगसह अन्य कोणतीच वस्तू नेऊ दिली नाही. या संधीचा फायदा घेत स्थानिक दुकानदारांनी सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटप्रेमींची अक्षरश: लूट केली. त्यांनी स्टॅण्डमध्ये हेल्मेट ठेवण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये, तर बॅगसाठी 75 रुपये वसूल केले. दुकानदारांच्या मनमानीपुढे क्रिकेटप्रेमापोटी प्रेक्षकांचाही नाइलाज होता. 

Image may contain: 2 people, people smiling, hat and outdoor

रावण अवतरला 
या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींचे विविध रंग व रुप पाहायला व अनुभवायला मिळाले. सामना पाहण्यासाठी काही प्रेक्षक रावणाच्या वेषात आले, तर काही राम बनून आले. आशीष लेंडे नावाचा प्रेक्षक सामना पाहण्यासाठी चक्‍क रावणाच्या वेषात आला. याशिवाय रंगबिरंगी फेटे आणि विग घालूनही अनेकांनी सामन्याचा आनंद घेतला. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing, child, shoes and outdoor

"विराट, वुई मिस यू' 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये पदार्पण केल्यापासून विराट नेहमीच नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र या मालिकेतून "ब्रेक' घेत विराट सध्या पत्नीसोबत भुतानमध्ये पर्यटन करीत आहे. क्रिकेटप्रेमींना त्याची अनुपस्थिती चांगलीच जाणवली. विराटच्या चाहत्यांनी "विराट, वुई मिस यू' अशा आशयाचे पोस्टर्स मैदानात झळकावून त्याच्याप्रती आदर व प्रेम व्यक्‍त केले. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing and outdoor

चोख पोलिस बंदोबस्त 
भारत बांगलादेश टी20-सामन्यासाठी स्टेडियम परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टेडियमच्या आत, बाहेर व वर्धा रोडवर श्‍वान पथकासह तब्बल नऊशे पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. स्टेडियमच्या आत प्रवेश देण्यापूर्वी मेटल डिटेक्‍टरच्या मदतीने प्रेक्षकांची कसून तपासणी करण्यात आली. 

Image may contain: 5 people, people standing, sky, child, tree and outdoor

 

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

वर्धा मार्गावर नेहमीप्रमाणे ट्राफिक जॅम 
जामठा स्टेडियमवर वनडे असो वा टी-20 सामना. वर्धा मार्गावर ट्राफिक जॅम होणे नेहमीचेच चित्र आहे. रविवारचा सामनाही त्याला अपवाद ठरला नाही. मेट्रो, रस्ते आणि खापरी पुलाचे सुरु असलेले काम यामुळे वर्धा मार्गावर दुचाकी व चार चाकी वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुक सुरळीत करताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. दुपारी तीन वाजतापासूनच क्रिकेटप्रेमींनी व्हीसीए परिसरात गर्दी केली होती. सामना आटोपल्यानंतर जवळपास तासभर प्रेक्षक जॅममध्ये फसले होते. 

Image may contain: car, sky, night and outdoor

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: T 20 cricket feaver at nagpur