'चेस'च्या खेळीने विंडीजने टाळला पराभव

पीटीआय
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

किंग्स्टन (जमैका) - रॉस्टन चेसचे शतक आणि ब्लॅकवूड, डॉवरीच, होल्डर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजला भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा संघ 1-0 असा आघाडीवर आहे.

बुधवारी अखेरच्या दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही. पण, चेसने एका बाजूने दिवसभर फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. सुरवातीला त्याने ब्लॅकवूडसह 93 धावांची भागिदारी केली. ब्लॅकवूड 63 धावांवर अश्विनचा शिकार ठरल्यानंतर चेसने डॉवरीच्या साथीने 144 धावांची शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ ठरविले. अखेर कर्णधार होल्डरला साथीला घेत चेसने दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. चेस 137 धावांवर आणि होल्डर 64 धावांवर नाबाद राहिले. 

पाचव्या दिवशी सकाळच्या अडीच तासांच्या सत्रात वेस्ट इंडीजनी एकच फलंदाजाला गमावताना चांगली लढत दिली. रोस्टन चेसने भारताच्या पाच फलंदाजांना बाद करण्याची कमाल केली होती, त्या पाठोपाठ सुंदर फलंदाजी करत त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा धावफलक 5 बाद 215 असा होता. थोडक्‍यात सलग दुसऱ्या कसोटीतील विजयापासून भारतीय संघ पाच पावलेच दूर होता. अखेर भारतीय संघ विजयापासून दूरच राहिला.