Sports : अविनाश, पारुलचा राष्ट्रीय विक्रम

लॉस एंजिलिस फेस्टिवल स्पर्धेमध्ये १२ वे आणि ९ वे स्थान
sports
sports sakal

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकणारा २८ वर्षीय अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांनी मोसमाची भन्नाट सुरुवात करताना अनुक्रमे पुरुष व महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

अमेरिकेतच सरावाला असलेल्या मराठमोळ्या अविनाशने लॉस एंजिलिस येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक फेस्टिवल स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यत १३ मिनिटे १९.३० सेकंदांत पूर्ण करताना गेल्या वर्षी ६ मे रोजी नोंदवलेला १३ मिनिटे २५.६५ सेकंदाचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा केला. गेल्या वर्षी त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला होता.

sports
Cricket : गतविजेत्या गुजरातचा आठवा विजय

या शर्यतीत त्याला १२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहा हजार मीटर शर्यतीतही अविनाशचा सहभाग होता; मात्र तो शर्यत पूर्ण करू शकला नाही. अविनाश सध्या अमेरिकेत सरावाला असला, तरी त्याच्या मोरोक्कोतील विशेष सरावाला काही दिवसांपूर्वीच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेपूर्वी तो मोरोक्कोत सराव करणार आहे. आजच्या कामगिरीमुळे तो यंदाच्या मोसमातील यादीत ३३ व्या क्रमांकावर आला आहे. त्यात १८ केनियन धावपटूंचा समावेश आहे.

प्रीजा श्रीधरनला मागे टाकले

sports
Mumbai : साडेतीन लाख किमतीचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला परत!

मूळ उत्तर प्रदेशची असलेल्या व २०१९ च्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या पारुल चौधरीने १५ मिनिटे १०.३५ सेकंदात शर्यत पूर्ण करताना केरळच्या प्रीजा श्रीधरनने २०१० च्या गुंगझाओ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना नोंदवलेला १५ मिनिटे १५.८९ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

तिने या शर्यतीत नववे स्थान मिळवले. याशिवाय पुरुषांच्या तीन हजार स्टीपलचेस शर्यतीत शंकरलाल स्वामीने ८ मिनिटे ४२.९२ सेकंदात शर्यत पूर्ण केली. पुरुषांच्या पंधराशे मीटर शर्यतीत अजय कुमारने ३ मिनिटे ३९.८९ सेकंद वेळ नोंदवली. २०१९ नंतर अजयने प्रथमच ३ मिनिटे ४० सेकंदाच्या आत शर्यत धावण्याची कामगिरी केली. परवेश खानने मात्र दुखापतीमुळे माघार घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com