अवघ्या १६ वर्षाच्या स्पिनरच्या जाळ्यात अडकला नेपाळचा संघ, ८ धावांवर ऑलआऊट

टी२० क्रिकेटमध्ये नेपाळचा संघ अवघ्या ८ धावांवर परतला तंबूत.
अवघ्या १६ वर्षाच्या स्पिनरच्या जाळ्यात अडकला नेपाळचा संघ, ८ धावांवर ऑलआऊट
esakal

यूएई विरुद्ध नेपाळ (UAE vs Nepal) या दोन संघात १९ वर्षाखालील महिला टी२० आशिया चषकाच्या क्लालिफायर सामना पार पाडला. या सामन्यात नेपाळच्या संघाला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. अवघ्या ८ धावांवर नेपाळचा संघा ऑलआऊट झाला.

नेपाळचा महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला, तेव्हा दुसऱ्याच षटकांत पहिला झटका लागला. त्यानंतर मात्र नेपाळच्या संघातील फलंदाजीला गळती लागली आणि बघता बघता सामन्याच्या ९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नेपाळचा पूर्ण संघ बाद झाला.

त्यामुळे यूएईला या सामन्यांत १० विकेट्स आणि तब्बल ११३ चेंडू राखत मोठा विजय मिळाला. या विजयात अवघ्या १६ वर्षाच्या स्पिनर महिका गौरचे मोठं योगदान आहे.

अवघ्या १६ वर्षाच्या स्पिनरच्या जाळ्यात अडकला नेपाळचा संघ, ८ धावांवर ऑलआऊट
खासदार असुनही IPL मध्ये का काम करतो? गंभीरने दिले सडेतोड उत्तर

यूएईसाठी गोलंदाजीची सलामी देणारी १६ वर्षीय ऑफस्पिनर महिका गौर हिने चार षटकांत दोन मेडनसह दोन धावा देत पाच बळी घेतले. नव्या चेंडूसह तिची जोडीदार इंदुजा नंदकुमारने चार षटकांत सहा धावा देत तीन बळी घेतले. नेपाळचा डाव 8.1 षटकांत आटोपला, त्यानंतर त्याच यूएईने सात चेंडूंत लक्ष्य गाठले.

अवघ्या १६ वर्षाच्या स्पिनरच्या जाळ्यात अडकला नेपाळचा संघ, ८ धावांवर ऑलआऊट
French Open : इगाने फ्रेंच ओपनवर कोरलं नाव; 18 वर्षाच्या कोकोचं स्वप्न अधुरं...

नेपाळने या सामन्यानंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा निराशाजनक विक्रम आपल्या नावे केला आहे. नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या यूएई संघाने मात्र केवळ ९ धावांचे असणारे लक्ष्य फलंदाजीला आल्यानंतर केवळ ७ चेंडूत पूर्ण केले. त्यामुळे यूएईला या सामन्यांत १० विकेट्स आणि तब्बल ११३ चेंडू राखत मोठा विजय मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com