INDvsBAN : 19 वर्षांचा गोलंदाज पडला रोहित-शिखरवर भारी

वृत्तसंस्था
Saturday, 2 November 2019

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे सलमावीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना बाद करणे अत्यंत अवघड आहे. भल्या भल्या गोलंदाजांना हे जमत नाही. मात्र, बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव करत असताना नेट्समध्ये केवळ 19 वर्षांच्या गोलंदाजाने त्यांना बाद केले आहे. 

तिकडं बॉलर धावायला लागला अन् याचं तोंड किपरकडं!

केशव दबास या वोगवान गोलंदाजाने ही किमया केली आहे. भारताचा नेट्समध्ये सराव सुरु असताना त्याने आधी रोहित आणि मग शिखरला बाद केले. मात्र, त्यांना बाद केल्यावर आनंद साजरा कसा करायचे हेच त्याला पटकन कळले नाही. ''त्यांना बाद करणं हा खूप चांगला अनुभव होता. आता काय बोली हे कळंत नाहीये,'' अशा शब्दांत त्याने आपला आनंद व्यक्त केला. 

त्याची गोलंदाजची पाहून भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची चौकीही केली. तो म्हणाला, ''रवी शास्त्रींनी माझे कौतुक केले नाही मात्र, मी कोणत्या क्लबकडून खेळतो हे शार्दुल ठाकूरने विचारले.''

शाकिबच्या बंदीनंतर बांगलादेशच्या चाहत्यांनी केले रोहित-विराटला टार्गेट 

टीम इंडियासाठी गोलंदाजी करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. तो दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 Year Old Bowler Keshav Dabas Dismisses Rohit Sharma and Shikhar Dhawan In Nets