महाराष्ट्राच्या सहेली, नमिता उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - भारतीय शालेय महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सहेली आणि नमिता यांनी मुलींच्या अनुक्रमे ४३ आणि ३८, तर कल्पेन जाधव आणि दर्शन निकम यांनी मुलांच्या अनुक्रमे ४२ आणि ५० किलो वजनी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

वारजे येथील उत्तमनगर येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते पार पडले. 

स्पर्धेतील मुलांच्या ४२ किलो वजनी गटात कल्पेन जाधव याने पंजाबच्या पिंदरसिंग, तर ५० किलो वजनी गटात दर्शन निकम याने हिमाचल प्रदेशाच्या रोहित याच्यावर गुणांवरच मात केली. मुलींच्या विभागातही सहेली आणि नमिता यांनी गुणांवर अनुक्रमे गुजरातच्या भारती आणि पंजाबच्या नवदीपचे आव्हान संपुष्टात आणले. 
महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच कौतुकास्पद असली, तरी हरियानाच्या नितीश आणि गुजरातच्या पवन वदर यांनी मिळविलेले विजय निश्‍चितच लक्षवेधी ठरले. बहुतेक कुस्ती गुणांवरच निकाली होत असताना ४२ किलो वजनी गटात नितीशने भारंदाज डावाचा सुरेख वापर करून नवोदय विद्यालय संघटनेच्या आकाशला चीतपट केले. त्यानंतर ५० किलो वजनी गटात पवनने अशीच आक्रमक कुस्ती करताना चंडीगडच्या माँटी कुमारला आस्मान दाखवले. 

निकाल (उपांत्यपूर्व फेरी)
मुली ः ४३ किलो ः भारती (दिल्ली) वि.वि. नरिना (सीबीएससी), भारती (मध्य प्रदेश) वि.वि. नोसेझोनू (नागालॅंड), सहेली (महाराष्ट्र) वि.वि. भारतीय (गुजरात), एस. के. तस्लीम (आंध्र) वि. वि. काजल (चंडिगड), ३८ किलो ः रवीना वि.वि. रोशनी (दिल्ली), नमिता (महाराष्ट्र) वि.वि. नवदीप (पंजाब), बहिरिका (गुजरात) वि.वि. प्रगती (सीबीएससी), विशाखा (मध्य प्रदेश) वि.वि. नितू (झारखंड)

मुले ः कल्पेन जाधव (महाराष्ट्र) वि.वि. पिंदरसिंग (पंजाब), प्रमोद (चंडिगड) वि.वि. पवन (तेलंगणा), नवीन (दिल्ली) वि.वि. नुटा पुरो (नागालॅंड), नितीश (हरियाणा) वि.वि. आकाश (नवोदय विद्यालय संघटन), ५० किलो ः दिपक (दिल्ली) वि.वि. साहिल (पंजाब), विपीन (हरियाना) वि.वि. संतोष (कर्नाटक), पवन वदर (गुजरात) वि.वि. माँटी कुमार (चंडिगड), दर्शन निकम (महाराष्ट्र) वि.वि. रोहित (हिमाचल प्रदेश)

Web Title: 62 th National School Wrestling Championships