8 फूटी अफगाण चाहता मॅचसाठी भारतात आला अन् उंचीमुळे लटकला

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी तो लखनोमध्ये पोहोचला पण त्याला राहण्यासाठी एकही हॉटेल मिळाले नाही आणि याला कारण होते ते त्याची उंची. त्याच्या अतिउंचीमुळे त्याला कोणतेच हॉटेल रुम देण्यास तयार होत नव्हते. 

लखनौ : वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून लखनौमध्ये एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होत आहे. ही मालिका पाहण्यासाठी अफगाणिस्तानचा चाहता शेरखान भारतात आला आहे. मात्र, त्याची उंची तब्बल 8 फूट 3 इंच असल्याने तो चांगलाच लटकला आहे. 

लखनौच्या इकाना स्टेडियमवर आजपासून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला सुरवात होत आहे. या मालिकेसाठी शेरखान अफगाणिस्तानहून भारतात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी तो लखनोमध्ये पोहोचला पण त्याला राहण्यासाठी एकही हॉटेल मिळाले नाही आणि याला कारण होते ते त्याची उंची. त्याच्या अतिउंचीमुळे त्याला कोणतेच हॉटेल रुम देण्यास तयार होत नव्हते. 

8 feet tall afghanistan fan in india

सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्याला कोणताच हॉटेल मालक रुम देण्यास तयार होत नव्हता. अखेरी शेरखानने पोलिंसाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.  ''शेरखान सोमवारी लखनौमध्ये आला, तेव्हापासून तो हॉटेल्सच्या फेऱ्या मारतोय. मात्र, त्याला कोणीच रुम देण्यास तयार नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कागदपत्रांची पाहणी केली आहे आणि सर्व काहदपत्रांची खात्री केल्यावर त्यांनी त्याला चारबागच्या एका हॉटेलमध्ये एक रुम मिळवून दिली,'' अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकारी विकास चंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 feet tall fan from Afghanistan faced problems in India