अबब! ९०० जणांचे पथक ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

नवी दिल्ली - आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिंपिक संघटना तब्बल ९०० सदस्यांचे पथक पाठविण्याचे नियोजन करीत आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे प्राथमिक यादी तब्बल २३७० जणांची आहे. ३० जूनपर्यंत ती कमी करण्यात येईल.

नवी दिल्ली - आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिंपिक संघटना तब्बल ९०० सदस्यांचे पथक पाठविण्याचे नियोजन करीत आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे प्राथमिक यादी तब्बल २३७० जणांची आहे. ३० जूनपर्यंत ती कमी करण्यात येईल.

ही स्पर्धा इंडोनेशियातील जाकार्तामध्ये १८ ऑगस्ट ते दोन सप्टेंबरदरम्यान होईल. ६२० पेक्षा थोडे जास्त क्रीडापटू आणि २७३ पदाधिकारी अशा सुमारे ९०० जणांच्या पथकाला परवानगी मिळेल, अशी खात्री आयओएचे अध्यक्ष नरींदर बात्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांना वाटते. क्रीडा मंत्रालय इतक्‍या मोठ्या पथकाला मंजुरी नाकारू शकतो. मेहता यांनी सांगितले, की क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करून आम्ही यादी ९०० पर्यंत खाली आणू. बात्रा म्हणाले, की आम्ही निवडीचा निकष ठेवला आहे. वैयक्तिक खेळांत पहिले सहा, तर सांघिक खेळांत पहिले आठ क्रमांक, असा २०१४ मधील इंचॉन स्पर्धेचा निकष आहे.

२०३२ ऑलिंपिक संयोजनात रस
    ‘आयओए’ २०३० आशियाई क्रीडा स्पर्धा व २०३२ ऑलिंपिक संयोजनात रस असल्याचा प्रस्ताव सादर करणार.
    यास ‘एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (इओआय) असे संबोधले जाते
    २०२१ किंवा त्यापुढे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) अधिवेशन (काँग्रेस) आयोजित करण्यासाठीही ‘इओआय’ सादर करणार

२३७० प्राथमिक यादी
१९३८ क्रीडापटू
३९९ पदाधिकारी
८ आयओए पदाधिकारी
७ क्रीडा मंत्रालय
१८ साई
९०० नियोजित यादी
६२० क्रीडापटू
२७३ पदाधिकारी
५४१ इंचॉनमधील सहभाग

Web Title: 900 member team for indian olympic association