T20 World Cup : मोहम्मद शमीला संघात घ्यायला हवं होतं! माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

T20 World Cup : मोहम्मद शमीला संघात घ्यायला हवं होतं! माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

Mohammed Shami T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा यावेळीस ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार असून या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या भारतीय संघाची ‘बीसीसीआय’ने सोमवारी घोषणा केली. बीसीसीआयने टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या ग्रुपशिवाय चार राखीव खेळाडू ठेवले आहेत. यात मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

मुख्य संघातील एखादा खेळाडू दुर्दैवाने जायबंदी झाल्यास या राखीव खेळाडूंपैकी एकाचा संघात समावेश केला जाईल. मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजाला संघाबाहेर ठेवत राखीव क्रिकेटपटू बनवणे हे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याला फारसं पसंत पडलेलं नाहीये. मुख्य संघातील एक फिरकीपटू कमी करून त्याजागी शमी याला संघात घ्यायला हवं होतं असं मत आकाश चोप्रा याने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2022 : रोहितने 'विराट सेने'तील सहा जणांना दिला नारळ

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल या वेगवान जोडगोळीला संघात स्थान देण्यात आलं आहे. उपकर्णधार लोकेश राहुल हा कर्णधार रोहित शर्माच्या साथीने सलामीला उतरलेला पाहायला मिळेल. माजी कर्णधार विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांच्यावर फिरकी गोलंदाजीची, तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2022 : टीम इंडियात शमीला न घेण्याचे हे आहे खरे कारण

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Web Title: Aakash Chopra T20 World Cup Mohammed Shami From India Squad 2022 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..