एबी डिव्हिलियर्सची क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय आज घेतला. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय आज घेतला. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

डिव्हीलियर्सने ज्या मैदानावर आपला पहिला क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुन त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. डिव्हीलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र एक प्रकारचा धक्काच बसला आहे. आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मी खेळलो आहे, त्यामुळे यापुढच्या काळात तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी खुप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळत असल्याने मला मला आता थकल्यासारखे वाटत आहे. असे बोलल्याचा व्हिडियो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
 

34 वर्षीय डिव्हिलियर्सने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांतून 8765 तर 228 एकदिवसीय सामन्यांतून 9577 आणि 78 टी-ट्वेंटी सामने खेळताना 1672 धावा काढल्या आहेत. त्याचबरोबर तो आयपीएलमध्येही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळलेला आहे. आत्ताच त्याने आयपील सामन्यात एक अप्रतिम झेल घेतला होता. 

डिव्हिलियर्सने शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळला होता. तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 डिसेंबर 2004 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटीतून पदार्पण केले होते. 

Web Title: AB de Villiers announces retirement from international cricket