अभिजित कटके तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

जालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. 

जालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. 

शनिवारी (ता. 22) सायंकाळी झालेल्या लढतीत अभिजित कटकेने सोलापूरच्या रवींद्र शेंडगेला मात देत दणदणीत विजय मिळवला. सहाच्या सुमारास आखाडा क्रमांक एक वर सुरू झालेल्या या कुस्तीत रवींद्र शेंडगेने आक्रमक खेळणे सुरुवात केली. संयम राखत खेळणाऱ्या अभिजितने मात्र रवींद्रला मागे सारत मैदानाबाहेर केले. या डावाच्या आधारावर त्याने पावणे सहा मिनिटे शिल्लक असताना 2 गुणांची कमाई केली. या नंतर साडेचार मिनिटे शिल्लक असताना संधी मिळताच अभिजीतने रवींद्र शेंडगेला लपेट डावाच्या आधाराने चितपट मारले. या आधारावर त्याने अधिक चार गुणांची कमाई करत अभिजीतने 6-0 च्या फरकाने सामना पटकावला. 

दरम्यान, केसरीच्या माती गटात पोपट घोडके हा जळगावचा खेळाडू उपस्थतीत न झाल्याने जालन्याच्या विलास डोईफोडेने उपांत्य फेरीत धडक मारली होती. दुसरीकडे गादी गटातील लढतीत हर्षवर्धन सदगीर (नाशिक) आणि अतुल पाटील (जळगाव) हे दोघेही अनुपस्थित राहिल्याने दोघांना स्पर्धेतुन बाद करण्यात आले. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा पोचल्याचा अनंत आहे. उद्याच्या सामन्याची तयारी करतो आहे. महाराष्ट्र केसरी आहेच पण आपले ध्येय आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
- अभिजित कटके

Web Title: Abhijit Katake in finals of Maharashtra Kesari for 3rd time