अभिजित सरकार ‘एएचएफ’चे उपाध्यक्ष

पीटीआय
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाच्या (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महासंघाच्या ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकार ‘एएचएफ’च्या मार्केटिंग आणि टीव्ही समितीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. सरकार गेली २३ वर्षे सहारा परिवाराशी संलग्न असून, देशातील विविध खेळांना ‘सहारा’चा आर्थिक पुरस्कार मिळवून देण्यात सरकार यांचा वाटा महत्त्वाचा होता. भारतीय हॉकीच्या प्रसार कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. हॉकी लीगमधील उत्तर प्रदेश विझार्ड संघही ‘सहारा’च्या मालकीचा आहे.

नवी दिल्ली - भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाच्या (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महासंघाच्या ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकार ‘एएचएफ’च्या मार्केटिंग आणि टीव्ही समितीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. सरकार गेली २३ वर्षे सहारा परिवाराशी संलग्न असून, देशातील विविध खेळांना ‘सहारा’चा आर्थिक पुरस्कार मिळवून देण्यात सरकार यांचा वाटा महत्त्वाचा होता. भारतीय हॉकीच्या प्रसार कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. हॉकी लीगमधील उत्तर प्रदेश विझार्ड संघही ‘सहारा’च्या मालकीचा आहे. भारतीय हॉकी संघाच्या आर्थिक पुरस्काराचा करारही २०२१ पर्यंत सहारा यांनी वाढवला आहे.

Web Title: Abhijit Sarkar, vice-president AHF