एसी मिलानची सोळाव्या क्रमांकावर घसरण

एसी मिलान संघातील निराश खेळाडू
एसी मिलान संघातील निराश खेळाडू

रोम : अवघ्या काही वर्षांपूर्वी युरोपातील ताकदवान संघात गणना होत असलेले एसी मिलान सिरी ए या इटलीतील साखळीतच आता सोळाव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.

एसी मिलानला फ्लोरेंटिनोविरुद्ध 1-3 हार पत्करावी लागली. त्याचवेळी मारिओ नापोलीने विजयी मार्गावरून वाटचाल करताना ब्रेसियाला 2-1 असे हरवले. एसी मिलानच्या पिछेहाटीमुळे नवे मार्गदर्शक मार्को गिआमपाओलो यांची गच्छंती कधी हीच चर्चा सुरू झाली आहे. कधीच सराव झाला नाही, अशा संघाची कामगिरी जशी होईल तसा खेळ झाला, असे गिआमपाओलो यांनी सांगितले. आघाडीवरील इंटर मिलानने एसी मिलानला तब्बल दहा गुणांनी मागे टाकले आहे.

सेविलाचा चमकदार विजय
माद्रिद ः सेविलाविरुद्धच्या पराभवामुळे रेयाल सोशिएदादची ला लिगामध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी हुकली. रेयाल आणि ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने रेयाल सोशिएदादला अव्वल स्थान मिळवण्याची संधी होती, पण सेविलाने पिछाडीनंतर 3-2 बाजी मारली. या मोसमात नवे 12 खेळाडू खरेदी केलेले सेविला सहावे आहेत, पण त्यांच्यात आणि आघाडीवरील संघात दोनच गुणांचा फरक आहे. अग्रस्थान हुकलेले सोशिएदाद, बार्सिलोना आणि सेविलाचे गुण समान आहेत.

मार्सेलीची पिछेहाट
पॅरिस ः कामगिरीत सातत्य नसलेल्या मार्सेलीवर लीग वनमधील अव्वल चार संघातून बाहेर जावे लागले. त्यांना रेनेसविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. मार्सेलीने पहिल्या आठपैकी तीनच लढती जिंकल्या आहेत, ते आता पाचवे आहेत. ते आणि आघाडीवरील पीएसजी यांच्यात पाच गुणांचा फरक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com