INDvsSA : आफ्रिकेचा पाय खोलात; आणखी एक खेळाडू संघाबाहेर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो.

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 19 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी आफ्रिकेची चिंता मात्र खूप वाढली आहे. केशव महाराजनंतर आता त्यांचा आणखी एक खेळाडू जखमी झाला असून त्यालाही तिसऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे. 

गांगुली सुसाट, म्हणे शास्त्रींनी काय केलं?

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. यापूर्वीच दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा
केशव महाराज दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. 

Image result for aiden markram hd images

''त्याच्या मनगटाचे स्कॅनिंग केल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही,'' अशी माहिती संघाचे डॉक्टर हशेंद्र रामजी यांनी दिली. 

गांगुली आठवड्याभरात घेणार धोनीबाबत 'हा' मोठा निर्णय

भारताने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. तिसरा कसोटी सामना हा या मालिकेतील अखेरचा सामना असणार आहे जो रांचीला होणार आहे. मार्करमने या मालिकेत 44 धावा केल्या आहेत. त्याला फिरकीपटू अश्विनला खेळण्यात खूप अडचणी आल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aiden Markram Ruled Out Of The Third Test Against India