जयरामचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

कुचिंग, (मलेशिया) - भारताच्या अजय जयरामचे मलेशियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या सॉन वॅन हो याने 21-18, 21-14 असे हरविले. सॉनला पाचवे मानांकन आहे. त्याने 37 मिनिटांत विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये 18-18 अशी बरोबरी होती. त्यानंतर सॉनने सलग तीन गुण जिंकले. दुसऱ्या सेटमध्ये सॉनने सुरवातीपासून पकड राखली. सॉनला पाचवे मानांकन होते, तर जयराम जागतिक क्रमवारीत विसावा आहे. सलग चौथ्या सामन्यात जयरामचा सॉनकडून पराभव झाला. सॉनने 2012 मध्ये कोरियन आणि ऑस्ट्रेलियन, तर 2013 मध्ये चायना ओपन या स्पर्धांत जयरामवर मात केली होती.
Web Title: ajay jairam defeat