अजिंक्य रहाणे संघाबाहेर; मनिष पांडेला संधी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना वानखेडे मैदानावर होण्यापूर्वीच भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. यामुळे मनिष पांडेला संघात संधी देण्यात आली आहे, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (बुधवार) केली.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांमध्ये रहाणे धावा करण्यात अपयशी ठरला होता. परंतु, घरच्या मैदानवर तो चांगल्या धावा करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. सरावादरम्यान रहाणेच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने तो उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. रहाणेच्या जागी संघात युवा खेळाडू मनिष पांडे याला संधी देण्यात आली आहे, असे बीसीसीआयने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मुंबई येथील वानखेडे मैदानावर गुरुवारी (ता. 8) चौथा कसोटी सामना होत आहे तर चेन्नई येथे 16 डिसेंबर रोजी पाचवा सामना होणार आहे. यामुळे पुढील दोन्हीही सामने रहाणे खेळू शकणार नाही. भारतीय कसोटी संघाचा रहाणे उपकर्णधार आहे. इंग्लडविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ 63 धावा केल्या आहेत.

Web Title: Ajinkya Rahane out of series, Manish Pandey in