बॅडमिंटन प्रमुख गुप्ता यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

लखनौ - भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता (वय 56) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्‍याने निधन झाले. ते कॉंग्रेसचे नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी व्ही. के. वर्मा यांना अटक झाल्यानंतर गुप्ता यांनी 2012 मध्ये बॅडमिंटन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. 2014 मध्ये त्यांची चार वर्षांसाठी एकमताने फेरनिवड झाली होती. गेल्या वर्षी आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षपदीसुद्धा त्यांची निवड झाली होती. त्यांच्या पुढाकारामुळे भारताने 2014 मध्ये थॉमस-उबेर करंडक, सुपर सीरिज अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे आयोजन केले. सय्यद मोदी स्मृती स्पर्धेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पासून ग्रांप्री गोल्डपर्यंत वाढविण्यात आला. 2013 मध्ये भारतीय बॅडमिंटन लीगच्या संयोजनात त्यांचा मोठा वाटा होता. 2015 मध्ये प्रिमीयर बॅडमिंटन लीगमध्ये याचे रूपांतर झाले. गुप्ता यांच्या निधनामुळे "पीडीएमबीए'चे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी दुःख व्यक्त केले.
Web Title: akhilesh das gupta death