खंडेलवाल, गिरी, कुमार, मातंग चौथ्या फेरीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे, ता. 21 ः डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित अखिल भारतीय खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धेत मुंबईच्या स्पर्श फेरवानी व तहा खान, डेक्कन जिमखाना क्‍लबच्या समर खंडेलवाल, औरंगाबादच्या अनुराग गिरी, योगेश कुमार, सोनु मातंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून चौथी फेरी गाठली आहे.

पुणे, ता. 21 ः डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित अखिल भारतीय खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धेत मुंबईच्या स्पर्श फेरवानी व तहा खान, डेक्कन जिमखाना क्‍लबच्या समर खंडेलवाल, औरंगाबादच्या अनुराग गिरी, योगेश कुमार, सोनु मातंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून चौथी फेरी गाठली आहे.
डेक्कन जिमखाना क्‍लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईच्या स्पर्श फेरवानीने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या जयदीप खांडेकरचा 74(63)-08, 47-18, 51-13 असा पराभव केला. या वेळी स्पर्श फेरवानीने पहिल्याच फ्रेममध्ये 63 गुणांचा ब्रेक नोंदविला होता. टेबल्सच्या योगेश कुमारने पीवायसी क्‍लबच्या विशाल कदमला 72-42, 34-54, 80-27, 71-55 असे नमविले.
डेक्कन जिमखाना क्‍लबच्या समर खंडेलवालने क्‍यू मास्टर्सच्या आर्यन्स राजहंसवर 62-23, 64-07, 49-36 असा, मुंबईच्या तहा खानने साताराच्या गौरव कासारचा 68-28, 74-29, 71-42 असा, औरंगाबादच्या अनुराग गिरीने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारीचा 60-08, 66-52-, 65-16 असा, ऍरिझोना संघाच्या सेनू मातंगने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या
आनंद रघुवंशीला 50-71, 60-43, 71-61, 70-51 असे हरविले होते.
निकाल असे ः रोहित नारगोळकर (पीवायसी क्‍लब) वि.वि. विनिल रणपिसे (ऍरिझोना) 42-54, 60-20, 74-67, 57-09; चिंतामणी जाधव (क्‍यू क्‍लब) वि.वि. अनुप पिनाक (रॉयल्स संघ) 44-66, 68-44, 61-35, 55-37; स्पर्श फेरवानी (मुंबई) वि. वि. संजीव ताटके (डेक्कन जिमखाना क्‍लब) 72-12, 76-09, 64-08; साद सय्यद (क्‍यू क्‍लब) वि. वि. ऍरान्ता सॅंचेस (न्यू क्‍लब) 57-35, 73-18, 70-50; आनंद रघुवंशी (डेक्कन जिमखाना क्‍लब) वि. वि. कौशल परदेशी 85-23, 64-24, 70-11; जयदीप खांडेकर (डेक्कन जिमखाना क्‍लब) वि. वि. कैवल्य चव्हाण (सातारा) 73-44, 54-31, 57-56; मिलिंद कुऱ्हाडे (मुंबई) वि.वि. चेतन शेलार (न्यू क्‍लब) 48-25, 60-17, 22-56, 68-38; विठ्ठल ढमाले (डेक्कन जिमखाना क्‍लब) वि.वि. सत्चित जामगावकर (क्‍यू क्‍लब) 64-38, 61-19, 57-21; मुकुंद भराडिया (मुंबई) वि. वि. चेतन शेलार (न्यू क्‍लब) 75-03, 59-30, 72-25;
Web Title: All India Open Snooker Championship

टॅग्स