खेळांवरील सट्टेबाजीला मान्यता द्या : विधी आयोगाची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

नवी दिल्ली : भारतात क्रिकेट आणि अन्य खेळांवर लावला जाणारा बेकायदेशीर सट्टा आता कायदेशीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी विधी आयोगाने सरकारकडे क्रिकेटसह अन्य खेळांवरील सट्टेबाजीला मान्यता देण्यात यावी अशी शिफारस केली आहे. यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी विधी आयोगाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी केली आहे. 

सट्टेबाजीवर पूर्णपणे आळा घालण्यात अपयश आल्यामुळे मागील काही वर्षात सट्टेबाजांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे आणि त्यामुळे काळ्या पैशाच्या व्यवहारातही वाढ झाली आहे. सट्टेबाजीला अधिकृत करून कर कक्षेत आणावे असेही विधी आयोगाचे म्हणणे आहे. सट्टेबाजी पूर्ण रोखणे अशक्य असल्याने त्याला कर कक्षेत आणून त्याचे योग्य रितीने नियंत्रण करणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्या अहवलात स्पष्ट केले आहे.

Web Title: Allow betting on sports says Law panel