मिलमनची घोडदौड जोकोविचने रोखली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

न्यूयॉर्क - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याची घोडदौड ६-३, ६-४, ६-४ अशी रोखली. उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम जोकोविचने होऊ दिला नाही.

जोकोविच दोन वेळचा विजेता आहे. पहिल्या सेटमध्ये त्याने एक ब्रेकपॉइंट वाचविला. मिलमन याने आधीच्या फेरीत रॉजर फेडररला धक्का दिला होता. ही लढत दीर्घ रॅलींनी रंगली. त्यात ५७ रॅलीज किमान नऊ किंवा जास्त शॉटच्या झाल्या.

निशिकोरी-नाओमीचा विजय
जपानच्या केई निशीकोरी आणि नाओमी ओसाका यांनी उपांत्य फेरी गाठली. एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत दोन्ही गटांत अशी कामगिरी केलेले त जपानचे पहिलेच स्पर्धक ठरले. निशीकोरीने क्रोएशियाच्या मरिन चिलीचला २-६, ६-४, ७-६ (५), ४-६, ६-४ असे हरविले. २०१४च्या अंतिम सामन्यात चिलीचकडून तो हरला होता. नाओमीने युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोची घोडदौड ६-१, ६-१ अशी खंडित केली. निशीकोरीसमोर माजी विजेत्या नोव्हाक जोकोविच याचे आव्हान असेल. माँटे कार्लोमध्ये अंतिम, फ्रेंच ओपनमध्ये चौथी, तर विंबल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे निशीकोरी फॉर्मात आहे.

नाओमीची कामगिरी आणखी कौतुकास्पद ठरली. यापूर्वी किमीको डाटे हिने १९९६च्या विंबल्डनची उपांत्य फेरी गाठली होती.

२२ वर्षांच्या खंडानंतर ग्रॅंड स्लॅम उपांत्य फेरी गाठलेली नाओमी पहिलीच जपानी महिला ठरली. तिला २०वे मानांकन आहे. मार्च महिन्यात तिने इंडियन वेल्समधील स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील पहिलेवहिले जेतेपद मिळविले. लेसियाने दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीला हरविले होते. नाओमीसमोर अमेरिकेच्या मॅडीसन किज हिचे आव्हान असेल.

मॅडीसन हिने ३०व्या मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेझ नव्हारो हिला ६-४, ६-३ असे हरविले. तिने येथे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. हा सामना ८३ मिनिटे चालला.

ऑस्ट्रेलियन असूनही उष्णता जाणवली
मिलमन ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनचा रहिवासी आहे. तेथे भरपूर ऊन असते, पण न्यूयॉर्कमधील उष्ण हवामानाचा त्याच्यावर वेगळाच परिणाम झाला. दुसऱ्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना मिलमन याने ‘ब्रेक’ घेतला. घामामुळे ‘शॉर्ट’ ओली झाल्यामुळे सर्व्हिससाठी चेंडू ठेवता येत नाही, असे पंचांना सांगत तो लॉकर रूममध्ये गेला. दोन तास ४८ मिनिटे चाललेल्या लढतीत जोकोविचलाही टी-शर्ट, शॉर्ट घामामुळे अनेकदा बदलाव्या लागल्या.

Web Title: American Open Tennis John Millman Novak Djokovic