... अन् बिग बिंनी थेट रोहित शर्माला लावला व्हिडिओ कॉल

गर्लफ्रेंड की रोहित शर्मा असा प्रश्न बिग बिंनी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला विचारला होता.
KBC 13
KBC 13

मुंबई: बॉलीवूडमधील शंहशहा अमिताभ बच्चन जवळपास दशकभरापासून क्विज रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासमोरील हॉट शीटवर बसणाऱ्या चेहऱ्यांचे खास किस्से या कार्यक्रमातून समोर येत असतात. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकाच्या आयुष्याचा वेध घेण्याचाही बच्चनजी प्रयत्न करतात.

'कोन बनेगा करोडोपती'च्या हॉटसीटवर सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतर एक क्रिकेट प्रेमी सहभागी होणार आहे. बिग बी आणि हॉट सीटवर बसलेल्या प्रांशु त्रिपाठी यांचा प्रमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 1 कोटीच्या प्रश्नासाठी तयार असलेले त्रिपाठी हे रोहित शर्माचे चाहते आहेत.

KBC 13
पंजाबच्या खेळाडूची 'ती' पोस्ट म्हणजे मॅच फिक्सिंगचा सिग्नल?

यावरुन बिग बींनी त्यांना एक प्रश्न विचारला होता. गर्लफ्रेंड आणि रोहित शर्मा या दोघातील कुणाला निवडाल? असा प्रश्न बिग बिंनी विचारला होता. हा प्रश्न 7 कोटीसाठीच्या प्रश्नापेक्षा कठीण असल्याचे त्रिपाठी सांगतात. यावेळी त्रिपाठींनी आपल्या खिशातून पाकिट काढत त्यातील रोहित शर्माचा फोटो दाखवल्याचे व्हिडिओत दिसते. यानंतर अमिताभ बच्चन थेट रोहित शर्माला व्हिडिओ कॉल करतात. यावेळी परमेश्वराशी आपण काय बोलणार, अशी भावना हॉट सीटवर बसलेले त्रिपाठी व्यक्त करताना दिसते. रोहित शर्माने आपल्या या चाहत्याना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचेही पाहायला मिळते. बच्चनजीनी एका अर्थाने त्रिपाठी यांच स्वप्नच सत्यात उतरवलं आहे.

KBC 13
IPL 2021: राजस्थानच्या 'यंग ब्रिगेड'चा भन्नाट डान्स (Video)

रोहित शर्मा सध्या युएईमध्ये आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याच्याशिवाय उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात रोहितसह मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एका बाजूला क्रिकेटमध्ये व्यस्त असताना रोहितने आपल्या चाहत्यासाठी वेळ काढला. याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com