World Cup 2019 : ...म्हणून अफगाणिस्तानला अमूलची स्पाॅन्सरशिप

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

बड्या बड्या संघांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र, पैशाची अडचण असलेल्या या संघासाठी भारतातील डेअरी प्रोडक्ट्समधील अग्रगण्य कंपनी अमूल धावून गेली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : काबूल : मानेवर सतत गोळीबार, दगडफेक आणि दहशतवादी कारवायांची टांगती तलवार असूनही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर झपाट्याने आपली छाप पाडली आहे. बड्या बड्या संघांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र, पैशाची अडचण असलेल्या या संघासाठी भारतातील डेअरी प्रोडक्ट्समधील अग्रगण्य कंपनी अमूल धावून गेली आहे. 

अमूलने येत्या विश्वकरंडकात अफगाणिस्तानच्या संघाला स्पाॅन्सरशिप दिली आहे. यामागे एक खास कारणही आहे. अफगाणिस्तानमद्ये अमूलची वर्षभरात तब्बल 200 कोटींची उलाढाल होत असते. म्हणूनच अमूलने अफगाणिस्तानच्या संघाला स्पाॅन्सरशिप देऊ केली आहे. 

''भारतीय सरकार अफगाणिस्तानची पुनर्बांधणी करण्यात मदत करत आहे. आमचे संबंध 50 वर्षांपासून चालत आले आहेत. भारताचे खूप खूप धन्यवाद,'' असे मत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेमुख्य कार्यकारी अधिकारी असादुल्ला खान यांनी व्यक्त केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amul to sponsor Afghanistan Cricket team in World Cup 2019