न्यूझीलंडच्या सेटर्थवेटची सलग चार शतके

पीटीआय
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू एमी सेटर्थवेट हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकाविण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. पुरुषांमध्ये मात्र अशी कामगिरी श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात तिच्या शतकी खेळीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तिचे हे सलग चौथे शतक ठरले.  तिच्या शतकी मोहिमेस गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरवात झाली. त्या वेळी तिने पाकिस्तानविरुद्ध १३७, पाठोपाठ नाबाद ११५ आणि १२३ धावा केल्या.

नवी दिल्ली - न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू एमी सेटर्थवेट हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकाविण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. पुरुषांमध्ये मात्र अशी कामगिरी श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात तिच्या शतकी खेळीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तिचे हे सलग चौथे शतक ठरले.  तिच्या शतकी मोहिमेस गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरवात झाली. त्या वेळी तिने पाकिस्तानविरुद्ध १३७, पाठोपाठ नाबाद ११५ आणि १२३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी तीने नाबाद १०१ धावा केल्या. 

Web Title: Amy Satterthwaite Four consecutive centuries