'स्लॅम'चा प्रतिसाद वाढण्यासाठी शारापोवाची गरज नाही : मरे 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

क्रमवारीच्या आघाडीवर 
फ्रेंच ओपन पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी शारापोवाला क्रमवारीत पहिल्या 200 जणींत असण्याची गरज होती. त्यासाठी तिला स्टुटगार्टमध्ये किमान अंतिम फेरी गाठण्याची गरज होती, पण ती उपांत्य फेरीत क्रिस्टिना म्लाडेनोविच हिच्याकडून हरली. ती आता 262व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे आता तिला फ्रेंच ओपनची पात्रता फेरी किंवा मुख्य स्पर्धेत "वाइल्ड कार्ड' मिळण्याची गरज आहे. हा निर्णय फ्रेंच टेनिस महासंघ 16 मे रोजी घेईल. फ्रेंच ओपन 28 मे पासून सुरू होईल. 

लंडन - ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मिळणारा व्यावसायिक प्रतिसाद वाढावा म्हणून मारिया शारापोवाची गरज नाही, असे परखड प्रतिपादन ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने व्यक्त केले. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरलेल्या शारापोवाला पुनरागमनानंतर वाइल्ड कार्डची खिरापत वाटली जात आहे. त्याबद्दल काही महिला टेनिसपटूंनी जाहीर विरोध दर्शविला होता. यानंतर एका प्रमुख पुरुष टेनिसपटूने प्रथमच जाहीर भाष्य केले आहे. 

स्टुटगार्टसह माद्रिद आणि रोम या स्पर्धांच्या संयोजकांनी शारापोवाला "वाइल्ड कार्ड' दिले आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्येही तिला असाच आयता प्रवेश मिळण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर मरेने सांगितले की, लहान स्पर्धांचे प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करणे गरजेचे असते, त्यामुळे शारापोवाला "वाइल्ड कार्ड' मिळणे सोपे गेले. ती स्पर्धा "कव्हर' करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे असंख्य प्रतिनिधी गेले. या तुलनेत "स्लॅम'ना अशा "कव्हरेज'ची गरज नसते, कारण मुळातच मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. साहजिकच "स्लॅम'च्या संयोजकांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल. आघाडीवरील स्थान गाठण्यासाठी खेळाडूने परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते, हे या संयोजकांनी लक्षात घ्यायला हवे. शारापोवाने पहिल्याच स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ही स्पर्धा जिंकण्याच्या क्षमतेइतका दर्जा तिने प्रदर्शित केला आहे. ती लवकरच "टॉप'वर येऊ शकते हेच यातून दिसून येते. तीन- चार आठवड्यांत ती पुन्हा सर्वोच्च स्पर्धांमध्ये खेळू शकेल.

शारापोवाच्या फॉर्मनुसार "स्लॅम' संयोजकांचा "वाइल्ड कार्ड' देण्याचा निर्णय अवलंबून असेल असे मला वाटत नाही. 

क्रमवारीच्या आघाडीवर 
फ्रेंच ओपन पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी शारापोवाला क्रमवारीत पहिल्या 200 जणींत असण्याची गरज होती. त्यासाठी तिला स्टुटगार्टमध्ये किमान अंतिम फेरी गाठण्याची गरज होती, पण ती उपांत्य फेरीत क्रिस्टिना म्लाडेनोविच हिच्याकडून हरली. ती आता 262व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे आता तिला फ्रेंच ओपनची पात्रता फेरी किंवा मुख्य स्पर्धेत "वाइल्ड कार्ड' मिळण्याची गरज आहे. हा निर्णय फ्रेंच टेनिस महासंघ 16 मे रोजी घेईल. फ्रेंच ओपन 28 मे पासून सुरू होईल. 

विंबल्डनचा निर्णय 20 जूनला 
ऑल इंग्लंड क्‍लबचे संयोजक 20 जून रोजी शारापोवाला वाइल्ड कार्ड देण्याबाबतचा निर्णय घेतील. तोपर्यंत शारापोवा पात्रता फेरीत सहभागी होण्याइतपत क्रमवारीत मजल मारू शकेल. ऑल इंग्लंड क्‍लबचे अध्यक्ष फिलिप ब्रुक यांनी सांगितले, की, "आमच्याकडे वाइल्ड कार्डच्या प्रक्रियेची चाचपणी झाली असून, ती दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. आधी शारापोवा त्यासाठी अर्ज करते का हे आम्ही पाहू आणि इतर सर्वांप्रमाणे त्यावर विचार करू. आधीच्या स्पर्धांत कुणी चांगली कामगिरी केली आहे हे आम्ही पाहू. स्पर्धेची रंगत कशामुळे वाढेल, एखाद्याची कामगिरी विंबल्डनमध्ये भक्कम झाली आहे का, याचाही विचार आम्ही करू.' 

Web Title: Andy Murray believes Grand Slams don’t need Maria Sharapova to sell themselves