मिश्र स्कीट नेमबाजीत अंगद वीरसिंगला ब्राँझ

पीटीआय
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - भारतातील पहिल्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेस यजमानांच्या ब्राँझपदकाने सुरवात झाली होती. स्पर्धेची सांगताही भारताच्याच ब्राँझपदकाने झाली. पूजा घाटकरने पहिल्या दिवशी दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतील ब्राँझपदक पटकावले होते. अखेरच्या दिवशी अंगद वीरसिंग बाजवा याने मिश्र स्कीट स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले; मात्र या प्रकाराला अजून मान्यता नसल्यामुळे या पदकाची अधिकृत नोंद झाली नाही. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत अंगद हा अमेरिकेच्या हॅली दुन हिच्यासह सहभागी झाला होता. त्यांनी ब्राँझपदकाच्या लढतीत रॉबर्ट जॉन्सन आणि कॅटलिन कॉनर यांना २८-२६ असे पराजित केले.

मुंबई - भारतातील पहिल्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेस यजमानांच्या ब्राँझपदकाने सुरवात झाली होती. स्पर्धेची सांगताही भारताच्याच ब्राँझपदकाने झाली. पूजा घाटकरने पहिल्या दिवशी दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतील ब्राँझपदक पटकावले होते. अखेरच्या दिवशी अंगद वीरसिंग बाजवा याने मिश्र स्कीट स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले; मात्र या प्रकाराला अजून मान्यता नसल्यामुळे या पदकाची अधिकृत नोंद झाली नाही. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत अंगद हा अमेरिकेच्या हॅली दुन हिच्यासह सहभागी झाला होता. त्यांनी ब्राँझपदकाच्या लढतीत रॉबर्ट जॉन्सन आणि कॅटलिन कॉनर यांना २८-२६ असे पराजित केले. हेडन स्टुअर्ट आणि किम्बर्ली ऱ्होड या स्कीटमधील दिग्गजांनी एकमेकांच्या साथीत खेळत बाजी मारली. भारताचे मिश्र प्रकारातील हे दुसरे पदक ठरले. जितू राय आणि हीना सिद्धूने हा पराक्रम केला होता.

Web Title: Angad Vir Singh Bajwa