U19 Asia Cup गाजविणाऱ्या अर्थवची मुंबईच्या संघात एण्ट्री

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

-19 वर्षाखालील आशियाई करंडक विजेत्या भारतीय संघाचा हिराे अथर्व अंकाेलेकरची मुंबई संघात निवड

-विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळणार

-श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार

मुंबई : आशियाई एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात निर्णायक कामगिरी करून हिरो झालेल्या अथर्व अंकोलेकरची मुंबई संघात निवड झाली. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी अर्थवला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई या स्पर्धेचे गतविजेते आहेत. बंगळूर येथे यंदाची स्पर्धा होत आहे. मुंबईचा "अ' गटात समावेश आहे. आयपीएलमधील दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्या साथीला सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे अशी अनुभवी फलंदाजांची फौज आहे.

संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), जय बिश्‍त, आदित्य तरे, सर्फराझ खान, शिवम दुबे, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, यशस्वी जैसवाल, कृतिक हानागावाडी, शशांक अत्तार्दे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ankolekar in mumbai team