राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनुष्का पाटीलचे यश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर  - येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रविंद्र पाटील हिने त्रिवेंद्रम् येथे  झालेल्या 62 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत एक वैयक्तिक कांस्य व एक सांघिक रौप्य पदकांची कमाई केली. तिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात यश मिळविले.
महिलांच्या ज्युनियर दहा मीटर पिस्तूल प्रकारात तिने 600 पैकी 567 गुण मिळवत फायनल मध्ये प्रवेश मिळविला.

फायनलच्या 8 स्पर्धकामध्ये झालेल्या लढतीमध्ये 215.8 गुण मिळवत वैयक्तिक कांस्य पदक मिळविले तसेच याच गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत हर्षदा निटवे, अभिज्ञा  यांच्या साथीने 1800 पैकी 1691 गुण मिळवत रौप्य पदक पटकविले.  त्रिवेंद्रम् येथे  झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील सुमारे 7000  वर पुरुष आणि महिला नेमबाज सहभागी झाले होते.

या स्पर्धेपूर्वी अनुष्काने जर्मनी येथे झालेल्या जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळविले होते. जपानमध्ये झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेतही  तिला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. ज्यात तिने सांघिक चौथे स्थान प्राप्त केले होते.

अनुष्का हिच्या नेमबाजीतील या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया स्कूल गेम’ ने जाहीर केलेल्या यादीमध्ये तिने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने आठ ते दहा डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अनुष्काने  400 पैकी 375 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले व तिची इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .

Web Title: Anushka Patils success in the national shooting competition