५६ लाख खर्चाला न्यायालयाकडून मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे उद्यापासून (ता. ९) सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यावरील अनिश्‍चिततेचे सावट काही तास अगोदरच दूर झाले. सामन्याच्या आयोजनासाठी ५६ लाख खर्च करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिली. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असलेल्या बीसीसीआयच्या आर्थिक नाड्या सर्वोच्च न्यायालयाने आवळल्या आहेत. परिणामी, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी खर्च कसा करायचा, हा प्रश्‍न उभा राहिलेला होता. आर्थिक निधी नसेल तर सामना आयोजित करणे कठीण आहे. निधी मिळण्यासाठी बीसीसीआयने आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Web Title: Approved 56 million expenses Court