खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटीलची निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. 

सांगली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथे होणाऱ्या 4 थी स्व. खाशाबा जाधव राज्य स्तरीय फ्री व ग्रीकोरोमण कुस्ती मुले व वरिष्ठ महीला फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान अपूर्वा संभाजी पाटील पलूस यांची नागपूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून निवड झाली आहे.

पै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. त्यांच्या या निवडीबद्दल कवलापूर ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Web Title: Apurva Patil wrestling compitition