आशिया कप तिरंदाजीसाठी भारतीय संघ निवड साताऱ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई :आशिया कप तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड साताऱ्यात होईल. साताऱ्यात पुढील आठवड्यात राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धा होणार आहे. 

मुंबई :आशिया कप तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड साताऱ्यात होईल. साताऱ्यात पुढील आठवड्यात राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धा होणार आहे. 

आशिया कप (दोन) तिरंदाजी स्पर्धा बॅंकॉकला 19 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा कुमार संघ पाठवण्याचा निर्णय भारतीय तिरंदाजी संघटनेने घेतला आहे. साताऱ्यातील राष्ट्रीय कुमार स्पर्धेतूनच हा संघ पाठवण्याचे ठरले आहे. या स्पर्धेला धरूनच 25 फेब्रुवारीस या स्पर्धेतील रिकर्व्ह तसेच कम्पाउंड प्रकारातील सर्वोत्तम आठ तिरंदाजांत निवड चाचणी होईल. त्यातील सर्वोत्तम चौघांची आशिया कप स्पर्धेसाठी निवड होईल. ही स्पर्धा संपूर्ण साखळी पद्धतीने होणार आहे. 

साताऱ्यात 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा स्पोर्टस्‌ स्टेडियमवर होईल. या स्पर्धेला आशिया कप निवड चाचणीचा दर्जा लाभल्यामुळे देशातील सर्वच अव्वल कुमार तिरंदाज या स्पर्धेत सहभागी होतील.

Web Title: Archery Team India Asian Archery Championship Satara Sports