अर्जुन तेंडुलकर मुंबई संघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आंध्र प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विझी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. 50-50 षटकांची ही स्पर्धा आहे.

मुंबई : आंध्र प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विझी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. 50-50 षटकांची ही स्पर्धा आहे.

19 वर्षीय अर्जुन तेंडुलकर मे महिन्यात झालेल्या मुंबई ट्‌वेन्टी-20 लीग स्पर्धेत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. अर्जुन तेंडुलकरने केवळ भारतीय संघाच्याच नव्हे; तर इंग्लंड संघाच्याही नेटमध्ये गोलंदाजी केलेली आहे.

मुंबई संघ : हार्दिक तामोरे (कर्णधार), सृजन आठवले, रुद्र धनदाय, चिन्मय सुतार, अक्षय सरदेसाई, सिराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पूजराय, मॅक्‍सवेल स्वामीनाथन, प्रशांत सोळंकी आणि विग्नेश सोळंकी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arjun tenduikar selected in mumbai team