धोनी ट्रेनिंगसाठी जम्मू काश्मिरला रवाना, आर्मी प्रमुख बिपीन रावत यांची परवानगी 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विंडीज दौऱ्यावर न जाता भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. त्याला आता भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांनी परवानगी दिली आहे.  

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विंडीज दौऱ्यावर न जाता भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. त्याला आता भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांनी परवानगी दिली आहे.  

येत्या काही काळात धोनी जम्मू काश्मीरमध्ये सैन्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे. मात्र त्याला सैन्याच्या कोणत्याही ऑपरेशनमध्ये थेट सहभाग घेता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

धोनीने वेळोवेळी त्याचे भारतीय सैन्यावर असलेले प्रेम दाखवले आहे. त्याने पद्मभूषण पुरस्कार स्वीकारतानाही लष्कराचा ड्रेस परिधान केला होता. 

विंडीज दौऱ्यासाठी धोनीच्या अनुपस्थितीत एकदिवसीय आणि ट्वेंटी20 संघांत यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army general Bipin Ravat apporves MS Dhonis request to join army