अपंगत्व असूनही 'तिने' केला 4892 मीटरचा शिखर सर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवी दिल्ली : 'प्रयत्ननांती परमेश्वर' असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, बऱ्याचदा हे खरंही ठरतं. अशीच गोष्ट घडलीये एका महिलेबाबत. अरुनिमा सिन्हा असे त्या महिलेचे नाव. अरुनिमाने अंटार्क्टिका पर्वत माऊंट विन्सर सर केले. अरुनिमाबाबतची विशेष बाब म्हणजे कृत्रिम पाय आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर तिने हे पर्वत आज (शुक्रवार) सर केले. अशी कामगिरी करणारी अरुनिमा जगातील पहिली अपंग महिला ठरली आहे. 

अरुनिमाला धावत्या रेल्वेतून ढकलून देण्यात आले होते. त्यानंतर तिला तिचा एक पाय गमवावा लागला होता. हा अपघात 12 एप्रिल 2011 मध्ये झाला होता. मात्र, असे असतानाही तिने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने काम करण्याचे ठरविले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अरुनिमाने 21 मे, 2013 मध्ये माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यानंतर आता अरुनिमाने अंटार्क्टिकातील शिखर माऊंट विन्सर सर केले. त्यामुळे ती हे शिखर सर करणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. अरुनिमा ही भारतातील असल्याने संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब बनली आहे. 

दरम्यान, अरुनिमाने विन्सर सर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, एक्सेलंट! अरुनिमा सिन्हाचे अभिनंदन. तिने यशाची नवी उंची गाठली. अरुनिमा भारताचे वैभव आहे. तिने प्रचंड जिद्द आणि मेहनतीवर हे यश संपादन केले. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.     

Web Title: Arunima Sinha becomes worlds first woman amputee to scale Mount Vinson PM Modi congratulates her