Ashes मालिकेतील खराब कामगिरीमुळं Ashley Giles यांचा राजीनामा; जगभरात इंग्लंड संघाची नाचकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashley Giles

मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Ashes मालिकेतील खराब कामगिरीमुळं Ashley Giles यांचा राजीनामा

इंग्लंड (England Cricket Board) आणि वेल्स क्रिकेट बोर्डनं (ECC) अॅशेस मालिकेतील (Ashes Series) संघाच्या खराब कामगिरीबद्दल नुकतीच बोर्डाची बैठक घेतली. या बैठकीनंतर माजी क्रिकेटपटू Ashley Giles यांना इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला. तूर्तास Giles ची जबाबदारी अँड्र्यू स्ट्रॉसनं (Andrew Strauss) घेतलीय आणि भविष्यात या पदासाठी पूर्णवेळ बदलीचा निर्णय घेतला जाईल. यंदा अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात खेळवली गेली. यात इंग्लंडचा 0-4 असा पराभव झाला. याच खराब कामगिरीमुळं जगभरात इंग्लंड संघाची नाचकी झाली.

मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड (Chris Silverwood) यांच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन (Tom Harrison) म्हणाले, गेल्या तीन वर्षांत Ashley Giles नं इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाला (England Cricket Team) दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभारी आहोत, असं म्हंटलंय.

हेही वाचा: On This Day: 2018 ला कांगरूंचीच शिकार करत टीम इंडियाने रचला होता इतिहास

भारताविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा संघ चार कसोटी सामन्यांनंतर 1-2 नं पिछाडीवर राहिलाय. मालिकेतील पाचवी कसोटी पुढं ढकलावी लागलीय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिली, तर दुसरी कसोटी भारतानं 151 धावांनी जिंकलीय. तिसरी कसोटी इंग्लंडनं एक डाव आणि 76 धावांनी जिंकलीय, तर चौथ्या कसोटीत भारतानं 157 धावांनी मोठा विजय मिळवलाय.

Web Title: Ashely Giles Has Stepped Down From His Post As Managing Director Following An Ecb Board Meeting To Review The England Team Ashes Performance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top