ऍशेस कसोटी : लायनसमोर इंग्लिश फलंदाजांचे 'लोटांगण'; ऑस्ट्रेलियाचा विजय

Ashes Australia win 1st Test
Ashes Australia win 1st Test

बर्मिंगहॅम : पहिल्या दिवशी 8 बाद 122 अशी अवस्था त्यानंतर 90 धावांची पिछाडी अशी पिछेहाट होऊनही जिगरबाज ऑस्ट्रेलियाने पहिल्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा 251 धावांनी पराभव करण्याची शानदार कामगिरी बजावली. नॅथन लायनने आज अखेरच्या दिवशी सहा विकेट मिळवल्या. 

दोन्ही डावात शतके करून माजी कर्णधार स्टीव स्मिथने ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावर आणलीच पण विजयाचेही स्वप्न दाखवले आणि इंग्लंडसमोर काल चौथ्या दिवस अखेर 398 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने सात षटकांत बिनबाद 13 अशी सुरुवातही केली होती, परंतु आज इंग्लंडचा अख्खा डाव 146 धावांत गारद करून ऑस्ट्रेलियाने दुसरे सत्र संपायच्या आतच विजयास गवसणी घातली. आज 45 षटकांच्या खेळातच इंग्लंडच्या फलंदाजीचे तीनतेरा वाजवले. 

खेळपट्टी अखेरच्या दिवशी फिरकीस साथ देऊ लागली होती. याचा पुरेपुर फायदा घेत लायनने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. पॅट कमिंसने चार विकेट मिळवून इंग्लंड फलंदाजांची दुसऱ्या बाजूनेही नाकेबंदी केली. पहिल्या डावात इंग्लंडने 90 धावांची आघाडी घेण्याची कामगिरी बजावली असली तरी अखेरच्या दिवशी प्रतिकुल परिस्थिती आणि दडपण यांचा सामना करणे सोपे नव्हते आणि घडलेही तसेच 

पहिल्या डावातील शतकवीर बर्न्सला कमिन्सने बाद केल्यावर जेसन रॉय आणि कर्णधार ज्यो रूट यांनी संघाची धावसंख्या भले 60 पर्यंत नेली, पण लायनचा खेळ सुरु झाल्यावर इंग्लिश फलंदाजांची ड्रेसिंगरुममध्ये परतण्याची जणू घाईच सुरु झाली. त्यांचे एकूण सहा फलंदाज एकेरी धावाच करु शकले. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ख्रिस वोक्‍सने सर्वाधिक 37 धावा केल्या त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आज 45 व्या षटकांपर्यंत गोलंदाजी करावी लागली. कमिंसने वोक्‍सलाच बाद करून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोतर्ब केले. 

संक्षिप्त धावफलक : 

ऑस्ट्रेलिया - पहिला डाव : 284 आणि दुसरा डाव : 7 बाद 487 घोषित. 
इंग्लंड - पहिला डाव : 374 आणि दुसरा डाव : 52.3 षटकांत सर्वबाद 146 (जेसन रॉय 28, ज्यो रूट 28, ख्रिस वोक्‍स 37, नॅथन लायन 20-5-49-6, पॅट कमिंस 11.3-3-32-4)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com