आशिया करंडक भारताऐवजी अमिरातीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

दुबई - सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला आपल्या देशात खेळू न देण्याच्या भारतीयांच्या ठाम भूमिकेमुळे आशियाई करंडक स्पर्धा अखेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यास आशियाई क्रिकेट परिषदेला भाग पडले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा १३ ते २८ ऑक्‍टोबर दरम्यान भारतात होणार होती.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली आणि आम्हाला स्पर्धेचे ठिकाण बदलावे लागले, असे आशियाई क्रिकेटचे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष नजाम सेठी यांनी जाहीर केले.

यंदाच्या या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. सहावा संघ अमिराती, हाँगकाँग, नेपाळ, ओमन यांच्यातील स्पर्धेतून निश्‍चित होणार आहे.

या स्पर्धेचे ठिकाण बदलले जाणार हे अपेक्षित होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपंगाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार होता; परंतु अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. 

त्यामुळे हा अंतिम सामना दुबईत खेळवावा लागला होता. आता आशियाईतील उदयोन्मुख खेळाडूंची आशियाई स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणार आहे. 

या स्पर्धेत खेळण्यास भारताने नकार दिला, तर आशियाई स्पर्धेतून आम्ही माघार घेऊ, अशी धमकी पाकिस्तानने दिली होती. 

Web Title: asia cup 2018 cricket india amirati