Asia Cup 2023 BCCI vs PCB : इस में तेरा घाटा... बीसीसीआय पाकिस्तानला देणार जोरदार झटका | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2023 BCCI vs PCB

Asia Cup 2023 BCCI vs PCB : इस में तेरा घाटा... बीसीसीआय पाकिस्तानला देणार जोरदार झटका

Asia Cup 2023 BCCI vs PCB : आशिया कप पाकिस्तानात खेळवायचा की नाही याबाबत अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात वाद सुरू आहे. भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर तोडगा म्हणून पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव दिला होता. मात्र बीसीसीआयने तोही नाकारल्याचे वृत्त आहे.

आता तर बीसीसीआय सारखे नखरे करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने पाकिस्तानशिवायच आशिया कप खेळण्याचे प्लॅनिंग केले आहे. टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार आशिया कपमधील इतर संघ पाकिस्तानशिवाय आशिया कप खेळण्यास तयार आहेत.

एशिया क्रिकेट काऊन्सिलने श्रीलंकेत आशिया कपचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानला जर आशिया कपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना श्रीलंकेत खेळावे लागणार आहे.

आशिया कपच्या वादाचे पडसात हे या वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्लडकपवरही पडत आहे. पाकिस्तान सतत आशिया कप खेळण्यासाठी जर भारत पाकिस्तानात आला नाही तर ते वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार नाहीत अशी धमकी देत आहे. मात्र आयसीसीच्या चेअरमननी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला असे पाऊल न उचलू नये असे सांगितले. जर पाकिस्तान हे पाऊल उचलले तर आयसीसी त्यांच्यावर कडक कारवाई करू शकते.

पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांचे वर्ल्डकप खेळण्याबाबतच्या भुमिकेत नरमाई देखील आली आहे. पीसीबीने हा सर्व मुद्दा पाकिस्तान सरकारवर सोडून दिला आहे. नजम सेठी यांनी पाकिस्तान सरकार जर परवानगी देत असेल तर त्यांचा संघ नक्की भारतात जाऊन वर्ल्डकप खेळेल.

(Sports Latest News)