
IND vs SL Asia Cup 2023 Final : वॉशिंग्टन सुंदरला मिळाली संधी, कर्णधार रोहित शर्माने पुन्हा प्लेइंग-11 मध्ये केलं मोठे 6 बदल
IND vs SL Asia Cup 2023 Final : भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपची आणखी एक फायनल आज कोलंबोमध्ये खेळल्या जात आहे. आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शनाकाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला. जखमी महेश तिक्ष्णाच्या जागी हेमंता खेळत आहे.
तर कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये सहा बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जखमी अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. सुंदर ऑफ स्पिनर आहे.
टीम इंडियात पाचवा बदल अक्षर पटेलच्या रूपाने झाला, जो दुखापतीमुळे आशिया कपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला होता. अंतिम फेरीत अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सुंदर सामन्याच्या एक दिवस आधी श्रीलंकेत पोहोचला आहे.
भारत आणि श्रीलंका हे दोन्ही आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. आजच्या आधी या दोन संघांमध्ये झालेल्या 7 फायनलमध्येही स्पर्धा चुरशीची झाली आहे. भारताने 4 वेळा, तर श्रीलंकेने 3 वेळा बाजी मारली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदिरा, समरविक्रमा, चारिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेल्लालाघे, प्रमोद मदुसन, मॅथिस पाथिराना, दुशन हेमंथा.