Asian Badminton Championship : आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांचा कस

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
PV Sindhu Beats He Bing Jiao
PV Sindhu Beats He Bing Jiaoesakal

दुबई : भारतीय बॅडमिंटनपटूंना यंदाच्या मोसमात दुखापत व सुमार फॉर्म या दोन्हींनी ग्रासले आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुबई येथे उद्यापासून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पी.व्ही.सिंधू, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच.एस.प्रणॉय या भारताच्या प्रमुख खेळाडूंचा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये कस लागणार आहे.

सिंधूला दुखापतीमुळे काही काळ बॅडमिंटन कोर्टपासून दूर रहावे लागले. तिने पुनरागमन केल्यानंतरही त्वरीत यश मिळाले नाही. माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून तिने फॉर्म तरी मिळवला. मात्र आशियाई स्पर्धेतील पहिल्या फेरीत तिच्यासमोर तैवानच्या वेन शी सू हिचे आव्हान असणार आहे. या लढतीत विजय मिळवण्यासाठी तिला अव्वल खेळ करावाच लागणार आहे.

महिला एकेरीच्या अन्य लढतीत भारताच्या मालविका बन्सोड हिच्यासमोर गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी जपानची अकाने यामागुची हिचे आव्हान असणार आहे. आकर्षी कश्‍यप हिला इंडोनेशियाच्या कोमांग देवी हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

पुरुष एकेरीच्या लढतीत प्रणॉयला सलामीच्या लढतीत म्यानमारच्या फोन नैंग याचा सामना करावा लागणार आहे. किदांबी श्रीकांत बहरीनच्या अदनान इब्राहिम याच्याशी लढेल.

लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत खडतर आव्हान असेल. माजी विश्‍वविजेता सिंगापूरचा लोह किन यूव याच्याशी त्याला संघर्ष करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com