वेई-श्रीकांतच्या लढतीचे आकर्षण

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकताना ली चोंग वेई याने किदांबी श्रीकांतला हरवले होते. आता याच दोघांमधील लढत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. ही स्पर्धा मंगळवारपासून (ता. २४) चीनमध्ये होणार आहे.

गोल्ड कोस्टला सांघिक स्पर्धेत श्रीकांतने चोंग वेईचा पाडाव केला होता; तर त्याचे उट्टे चोंग वेईने पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत काढले. आता या स्पर्धेत श्रीकांतला अव्वल; तर चोंग वेईला पाचवे मानांकन आहे. चोंग वेईवर मलेशियाची पूर्ण मदार आहे. 

श्रीकांत पहिल्या आशियाई विजेतेपदासाठी प्रयत्न करेल, तर चोंग वेईने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. तो आणि श्रीकांत स्पर्धेच्या ड्रॉनुसार एकाच भागात आहेत. चाँग वेई श्रीकांतविरुद्धच्या संभाव्य उपांत्यपूर्व लढतीचा विचार करण्यास तयार नाही. चीनचा क्विओ बिन आणि इंडोनेशियाचा अँथनी गिनतिंग त्याचा पहिल्या दोन फेरींत कस पाहू शकतील.

चोंग वेई गतवर्षी उपांत्य फेरीत लीन डॅनविरुद्ध पराभूत झाला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत आशियाई स्पर्धा खूपच खडतर आहे, असे चोंग वेईने सांगितले. आता श्रीकांत आणि चाँग वेई यांच्यातील मुकाबला थॉमस कप (२० ते २७ मे) आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत होऊ शकेल. आशियाई स्पर्धेच्या मानांकन क्रमवारीत श्रीकांत खालोखाल दक्षिण कोरियाचा सोन वॅन हो याला स्थान आहे. सोनने जागतिक स्पर्धेत श्रीकांतला हरवले होते.

साईनाला मानांकनच नाही
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या साईना नेहवालला जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये नसल्यामुळे आशियाई स्पर्धेत मानांकन क्रमवारीत स्थान लाभलेले नाही; पण कोणीही तिला कमी लेखण्यास तयार नाही. बॅडमिंटन विश्‍लेषक तिचीही संभाव्य विजेतीत गणना करीत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील यशाने तिचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. त्यामुळेच ती डार्क हॉर्स झाली आहे.

Web Title: Asian Badminton Srikanth Kidambi Lee Chong Wei