Asian Games 2018 : भारताची रोइंगमध्ये आश्‍वासक सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जाकार्ता - भारताने आशियाई क्रीडा रोइंगमध्ये आश्‍वासक सुरवात केली. सायली शेळके-पूजा राजेंद्र यांच्यासह ओम प्रकाश-स्वर्ण सिंग आणि मलकित सिंग-गुरिंदर सिंगने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑलिंपिकमध्ये लक्षवेधक कामगिरी केलेल्या दत्तू भोकनळ याला रिपेचेजद्वारेच पदकाची संधी असेल. 

सायली-पूजा महिला डबल स्कलच्या प्राथमिक फेरीत सहाव्या आल्या; पण त्यात दुसरी हिट रद्द झाली आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या डबल स्कलमध्ये हिट क्रमांक दोनमध्ये प्रकाश - स्वर्ण अव्वल आले. त्यांनी ७ मि. १०.२६ सेकंद अशी प्रभावी वेळ दिली. मलकित गुरिंदर पेअर प्रकारातील पहिल्या हिटमध्ये तिसरे आले. ते सर्वांगीण क्रमवारीतही तिसरेच आले आणि अंतिम फेरीस पात्र ठरले. 

दत्तू सिंगल स्कल्सच्या पहिल्या हिटमध्ये दुसरा आला; पण सर्वांगीण क्रमवारीत चौथा आला. त्यामुळे त्याला रिपेचेजद्वारे आता अंतिम फेरीतील स्थानासाठी प्रयत्न करावे लागतील. लाइटवेट फोर प्रकारात भोपल सिंग, जगबीर सिंग, तेजस शिंदे, प्रणय नौकारकर यांचा संघ हिटमध्ये दुसरा आला. सर्वांगीण क्रमवारीत ते चौथे आले. संजुक्‍या डुंगडुंग-हरप्रीत कौर पेअरच्या रिपेचेजसाठी पात्र ठरल्या आहेत.

Web Title: Asian Games 2018 Rowing Competition

टॅग्स