Asian Games 2018 : बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरी गाठल्याचे ऐतिहासिक समाधान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जाकार्ता - जलतरणात भारतीय जलतरणपटूंना अपयश आले. मात्र, यातही ३२ वर्षांनी २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात आशियाई स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याचे ऐतिहासिक समाधानावर भारतीयांना खूष रहावे लागले. 

केरळमधील पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या इडुक्की जिल्ह्यातील साजन प्रकाशने या वेळी ही कामगिरी केली. अर्थात, श्रीहरी नटराजन यानेही अंतिम फेरी गाठली; पण साजनने प्रथम हा मान मिळविला. भारताच्या खजान सिंगने १९८६ मध्ये आशियाई स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर प्रथमच भारतीय जलतरणपटू आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसला. 

साजन म्हणाला,‘‘केरळमध्ये पूरस्थिती भयानक असल्याचे मला माहीत आहे. मात्र, माझे कुटुंबीय कसे आहेत याची माहिती नाही. बऱ्याच जणांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे समजले आहे. मी कुटुंबीयांसह सर्वांच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना करतो.’’

भारतीयांचे मात्र समाधान अंतिम फेरीपुरतेच टिकले. साजन प्रकाश २०० मीटर बटरफ्लाय आणि श्रीहरी नटराज १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम शर्यतीत दोघे अपयशी ठरले. साजन १ मिनीट ५७.७५ सेकंद वेळेसह पाचवा आला. त्याच वेळी श्रीहरी ५६.१९ सेकंदांसह सातवा आला.

Web Title: Asian Games 2018 Swimming Butterfly