महाराष्ट्र राज्य कबड्डीचे आस्वाद पाटील, चांदेरे प्रतिनिधी

भारतीय कबड्डी महासंघ
भारतीय कबड्डी महासंघ

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सरकार्यवाह आस्वाद पाटील तसेच संघटनेच्या कार्यकारिणीत आजीव सदस्य या नात्याने प्रवेश मिळालेले बाबूराव चांदेरे यांची नावे प्रतिनिधी म्हणून पाठवली आहेत.

भारतीय कबड्डी महासंघावरील प्रशासक नित्तू न्यायाधीश एस. पी. गर्ग यांनी विविध संघटनांनी पाठवलेल्या प्रतिनिधींची नावे प्रसिद्धीस दिली आहेत. त्यानुसार आस्वाद पाटील आणि बाबूराव चांदेरे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतील. अपेक्षेनुसार राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांचा यात समावेश नाही.

दरम्यान, 28 संघटनांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतील. आंध्र प्रदेश, तेलंगण, चंडीगड, केरळ तसेच झारखंड संघटनेने प्रत्येकी चार; तर राजस्थानने तीन नावे पाठवली आहेत. पश्‍चिम बंगालमधील तीन; तर तमिळनाडूतील दोन संघटनांनी आपल्या प्रतिनिधींची नावे सादर केली आहेत.

सेना दल, भारत संचार निगम आणि रेल्वे यांना मतदानाचा आधिकार नाही, पण ते निवडणुकीसह होणाऱ्या वार्षिक सभेस उपस्थित राहू शकतात. सेनादलाने प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, पण भारत संचार निगम आणि रेल्वेने हे करणेही टाळले आहे. आता 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com