
कसोटीत पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विल पुकोवस्की आणि मार्कस लाबुशनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यादिवसाअखेर 2 बाद 166 धावा केल्या आहेत. खेल थांबला त्यावेळी लाबुशेन (67) तर स्मिथ (31) धावांवर खेळत होते. वॉर्नर बाद झाल्या नंतर युवा पुकोवस्की आणि लाबुशेन यांनी संघाचा डाव सावरला. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या सैनीनं ही जोडी फोडली. पुकोवस्कीला 62 धावांवर माघारी धाडले.
डेविड वॉर्नर आणि विक पुकोविस्की यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. वॉर्नरच्या रुपात सिराजने भारताला सुरुवातीलाच मोठे यश मिळवून दिले. 7.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता पंचांनी खेळाला हिरवा कंदील दाखवला. ऑस्ट्रेलियाने 1 बाद 21 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसरे सत्र संपले तेव्हा ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड बनवली होती. पुकोवस्की-लाबुशेन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत दुसरे सत्र ऑस्ट्रेलियाच्या नावे केले आहे. पुकोवस्कीने अर्धशतक पूर्ण केले असून यात भर घालण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
- पुकोवस्की-लाबुशेन या जमलेली जोडी नवदीप सैनीने फोडली. सैनीच्या एका अप्रतिम चेंडूवर पुकोवस्की पायचीत झाला. त्याने 62 धावा केल्या. खेळपट्टीवर आता स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन जोडी खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 125 धावा झाल्या आहेत.
-खेळ सुरु झाल्यानंतर कसोटीत पदार्पण करणारा पुकोवस्की आणि लाबुशनने संघाचा डाव सावरला आहे. ड्रिंक ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाच्या धावफलकावर 1 बाद 47 धावा; पुकोवस्की 24(63)* आणि मार्नस लाबुशेन 18 (55)
खेळात पावसाचा व्यत्यय
6-1 : वॉर्नरच्या रुपात टीम इंडियाला मोठं यश, सिराजला मिळाली विकेट, तो अवघ्या 5 धावा करुन परतला
-वॉर्नर-विल पुकोविस्की यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली