ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत संपुष्टात; भारताला आघाडी

शनिवार, 8 डिसेंबर 2018

पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीचा खेळ पावसाने पाऊण तास उशिराने चालू झाला. ट्रॅव्हीस हेडने स्टार्क सोबत चांगली सुरुवात केली. जसप्रीत बुमराने पुढे चेंडू टाकून स्टार्कला फटका मारायच्या मोहात पाडले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनने सुंदर फलंदाजी केली. आखूड टप्प्याचे चेंडू सोडून देताना लायनने पुढे पडलेल्या चेंडूंवर धावा जमा केल्या.

अ‍ॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि अश्विनने अ‍ॅडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 98.4 षटकांचा मारा करून ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांची शिकार केली. भारतीय संघाला 15 धावांची आघाडी मिळवून देताना चारही गोलंदाजांनी केलेला शिस्तपूर्ण मारा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.

आज (शनिवार) तिसर्‍या दिवशीच्या सकाळच्या सत्रातील खेळात उरलेल्या तीन फलंदाजांना बाद करून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर रोखला. सहा फलंदाज खेळवण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला तेव्हा संघातील 4 गोलंदाजांवर ताण येणार हे उघड होते.

पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीचा खेळ पावसाने पाऊण तास उशिराने चालू झाला. ट्रॅव्हीस हेडने स्टार्क सोबत चांगली सुरुवात केली. जसप्रीत बुमराने पुढे चेंडू टाकून स्टार्कला फटका मारायच्या मोहात पाडले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनने सुंदर फलंदाजी केली. आखूड टप्प्याचे चेंडू सोडून देताना लायनने पुढे पडलेल्या चेंडूंवर धावा जमा केल्या.

सकाळी सलग मारा करून थोडे थकल्यावर ईशांत शर्माच्या जागी विराट कोहलीने मोहंमद शमीला गोलंदाजीला आणले. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चांगला मारा करूनही शमीला फलंदाजाला बाद करता आले नव्हते. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शमीचे नशीब हसले. 72 धावा करून जम बसलेल्या ट्रॅव्हीस हेड आणि पुढच्याच चेंडूवर हेझलवुडला बाद करून शमीने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर संपुष्टात आणला.  

भारताच्या चार प्रमुख गोलंदाजांनी टप्पा आणि दिशा या वर सातत्याने नियंत्रण ठेवत मारा केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सहजी फटके मारून न दिल्याने दडपण सतत राखले गेले. 34 षटके टाकणार्‍या अश्विनला आणि बुमराला प्रत्येकी दोन बळी मिळाले. ईशांत शर्मा आणि शमीला प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करता आले. 15 धावांची हाती आलेली आघाडी मोठी नसली तरी समोरच्या संघावर मानसिक आघात करायला उपयुक्त ठरली.

Web Title: Australia bowled out on 235 runs at Adelaide against India